एक रुपये सर्वसमावेशक प्रधानमंत्री पीक विमा योजना महाराष्ट्र

Share This Info

महाराष्ट्र व इतर राज्यामध्ये 2016 च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक योजना राबविण्यात येत आहे. पण महाराष्ट्र सरकार कडून याचा मध्ये मोठा बदल करण्याचा निंर्णय घेतला आहे.आणि नवीन बदलनुसार या योजनेला सर्वसमावेशक पीक विमा योजना नाव देऊन. ही पुढच्या 3 वर्षासाठी राज्यात राबवन्यात येणार आहे.त्यानुसार महाराष्ट्र मधील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुयाया मध्ये पीक विम्यासाठि अर्ज करता येईल.

पीक विमा योजना काय आहे

भारत हा शेतकर्‍यांचा देश आहे ज्यात ग्रामीण लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण शेतीवर अवलंबून आहे.  माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी 2016 रोजी प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) या नवीन योजनेचे अनावरण केले.या योजनेमुळे त्यांच्या शेतीसाठी कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांवर प्रीमियमचा बोजा कमी होण्यास मदत होईल आणि खराब हवामानापासूनही त्यांचे संरक्षण होईल.

 पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विमा दावा निकाली काढण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ही योजना भारतातील प्रत्येक राज्यात संबंधित राज्य सरकारांच्या सहकार्याने लागू केली जाईल.  असोसिएशनमध्ये तोडगा काढण्याची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ही योजना भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रशासित केली जाईल.

Picsart 23 07 25 15 20 39 343

योजनेचे प्रमुख मुद्दे

केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक वर्मा योजनेअंतर्गत शेतकऱयांनी भरार्याचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवला आहे. सर्वसमावेशक पीक वर्मा योजनेअंतर्गत सदरचा शेतकरी हिस्स्याचा भार सुध्दा शेतकर्‍यांवर  न टाकता शेतकर्‍यांचा हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येईल. त्यामुळे सन 2023-24 पासून शेतक-यांना केवळ 1/- रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेली शेतकरी हिस्स्याची पीक निहाय प्रती हेक्टरी विमा हप्ता रक्कम व शेतक-यांनी प्रत्सयक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम रू. 1/- वजा जाता उर्वरीत फरकाची रक्कम राज्य हिस्सा अनुदान म्हणून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल.

या आधी सर्व खरीप पिकांसाठी  2% आणि सर्व रब्बी पिकांसाठी 1.5% एकसमान प्रीमियम शेतकऱ्यांनी भरावा लागत होता.वार्षिक व्यावसायिक आणि बागायती पिकांच्या बाबतीत, प्रीमियम  5% राहायचा .

यापूर्वी, प्रीमियम दरावर मर्यादा घालण्याची तरतूद होती ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी दाव्याचे पेआउट मिळत होते.  आता तो काढून टाकण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांना कोणत्याही कपातीशिवाय संपूर्ण विम्याच्या रकमेचा दावा मिळेल.

तंत्रज्ञानाच्या वापरास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाईल.  क्लेम पेमेंटमध्ये होणारा विलंब कमी करण्यासाठी स्मार्ट फोन, रिमोट सेन्सिंग ड्रोन आणि जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर क्रॉप कटिंग डेटा गोळा करण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी केला जाईल.

2016-2017 च्या अर्थसंकल्पात सादर केलेल्या योजनेसाठी 5, 550 कोटी रुपयांची तरतूद आहे. विमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) या एकाच विमा कंपनीद्वारे हाताळली जाईल.PMFBY ही राष्ट्रीय कृषी विमा योजना (NAIS) आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना (MNAIS) साठी बदलणारी योजना आहे आणि त्यामुळे सेवा करातून सूट देण्यात आली आहे.

Picsart 23 07 25 15 21 19 365

योजनेची उद्दिष्टे

 • नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे कोणतेही अधिसूचित पीक अपयशी झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
 • शेतीमध्ये शाश्वत प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे.
 •  शेतकऱ्यांना शेतीमध्ये नावीन्यपूर्ण आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे.
 •  कृषी क्षेत्राला पतपुरवठा सुनिश्चित करणे.
Picsart 23 07 25 15 22 55 153

पिकांचे कव्हरेज

खरिप हंगामातील

 1. भात (धान),
 2. ज्वारी
 3. बाजरी
 4. नाचणी
 5. मूग
 6. उडीद
 7. तूर
 8. मका
 9. भूईमूग
 10. कारळे
 11. तीळ
 12. सूर्यफूल
 13. सोयाबीन
 14. कापूस
 15. खरिप कांदा

या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.

रबी हंगामातील

 1. गहू
 2. रबी ज्वारी
 3. हरभरा
 4. उन्हाळी भात
 5. उन्हाळी भूईमूग
 6. रबी0 कांदा

या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.

जोखीम कव्हरेज

 पिकाचे खालील टप्पे आणि पिकाच्या नुकसानास जबाबदार असणारे धोके योजनेत समाविष्ट आहेत.

 • पेरणी/लागवड थांबविण्याशी संबंधित जोखीम: कमी पाऊस किंवा विमा उतरवलेल्या क्षेत्रातील प्रतिकूल हवामानामुळे पेरणी/लागवड थांबल्यामुळे.
 • उभी पिके (पेरणीपासून कापणीपर्यंत): दुष्काळ, दुष्काळ, पूर, पूर, कीटक आणि रोग, भूस्खलन, नैसर्गिक आग आणि वीज, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, टायफून, वादळ, चक्रीवादळ आणि चक्रीवादळ यांसारखे प्रतिबंध न करता येणारे जोखीम सर्वसमावेशक जोखीम विमा इ.मुळे उत्पन्नाचे नुकसान भरून काढण्यासाठी दिले जाते.
 • कापणीनंतरचे नुकसान: चक्रीवादळ आणि चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाच्या विशिष्ट संकटांमुळे उद्भवलेल्या कापणीपासून काढणीनंतरच्या स्थितीपर्यंत कमाल दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी कव्हरेज उपलब्ध आहे.
 • स्थानिकीकृत आपत्ती: अधिसूचित क्षेत्रातील मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूर यासारख्या स्थानिक धोक्यांमुळे प्रभावित झालेल्या वेगळ्या शेतांचे नुकसान/नुकसान.
Picsart 23 07 25 15 23 56 013

जोखीम वगळणे

 खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण लागू होणार नाही.

 • युद्ध आणि आत्मा धोका
 •  आण्विक धोका
 • दंगा
 • दुर्भावनापूर्ण नुकसान
 • चोरी किंवा शत्रुत्वाची कृती
 • पाळीव आणि/किंवा वन्य प्राण्यांचे चरणे आणि इतर टाळता येण्याजोगे धोके कव्हरेजमधून वगळले जातील.
Picsart 23 07 25 15 24 43 351

ऑनलाइन अर्ज कसा करायचा

ऑनलाइन नोंदणीसाठी, सर्वप्रथम प्रधानमंत्री फसल विमा योजना या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

अधिकृत वेबसाइट- https://pmfby.gov.in/ या लिंक वर क्लिक केल्या नंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्यासमोर उघडेल.जे तुमच्या स्क्रीनवर याप्रमाणे दिसेल.

1

वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला फोरमर कोर्नर(Farmer Corner) दिसेल या लिंकवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. जे तुमच्या स्क्रीनवर याप्रमाणे दिसेल.

2 2

या पेज मधे तुम्हाला दोन पर्याय दिले जातील.

 1) लॉगिन फॉर फार्मर (Login for Farmer)

 2) गेस्ट फार्मर(Guest Farmer)

 1. यानंतर, गेस्ट फार्मर(Guest Farmer)या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 2. क्लिक केल्या नंतर एक नवीन पेज उघडेल जे तुमच्या स्क्रीनवर याप्रमाणे दिसेल.
 3. फॉर्म हा 4 भागा मध्ये ठेवलेला आहे ज्या मध्ये तुम्हाला सर्वप्रथम

शेतकर्‍याची माहिती द्यायची आहे

तर चला फॉर्म भरायला शुरुवात करूया

फॉर्म चा पहिला टप्पा

Farmer Details

या मध्ये तुम्हाला शेतकर्‍याचे पूर्ण नाव,शेतकर्‍याच सबंध, वडिलांचं /पतीच नाव, मोबाइल नंबर,वय,जात, महिला /पुरुष, शेतकर्‍याचा प्रकार, मालक/ठेका/मक्ता

3 1
 1. Full Name -शेतकर्‍याचे पूर्ण नाव याचवर क्लिक करा.
  याचा मध्ये तुम्हाला शेतकर्‍याचे पूर्ण नाव लिहायचे आहे.
 2. Relationship -शेतकर्‍याचा सबंध
  • या पर्याया मध्ये अर्जदार हा कुणाचा मुलगा,मुलगी अथवा पत्नी आहे का ते निवडायचे आहे.येते तुम्हाला इंग्लिश मध्ये काही पर्याय दिसतील त्या मध्ये तुम्हाला सांगावं लागेल की तुमचा त्या व्यक्तीशी काय संबध आहे तुम्ही त्या व्यक्तीचे मुलगा आहे की मुलगी आहे की पत्नी आहे.
  • S/O –Son of- म्हणजे-जर तुम्हाला वडिलांचं किंवा पतीच नाव (relative Name) मध्ये जर टाकायचे असेल तर तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल.या मध्ये तुम्हाला सांगावं लागेल की तुमचा त्या व्यक्तीशी काय संबध आहे तुम्ही त्या व्यक्तीचे मुलगा आहे की मुलगी आहे की पत्नी आहे.
  • उदाहरण –जर माझे नाव शुभम राहुले आहे आणि मी अर्जदार आहे आणि माझा वडीलांचे नाव राजू राहुले आहे तर माला शेतकर्‍याचे पूर्ण नावा मध्ये मला शुभम राजू राहुले लिहावे लागेल नंतर शेतकर्‍याचा सबंधा मध्ये S/O निवडावे लागेल आणि वडिलांचं नाव (relative Name वडिलांचं किंवा पतीच नाव) या पर्याया मध्ये लिहावे लागेल तर याचा अर्थ असा होतो की शुभम राहुले हा राजू राहुले यांचा मुलगा आहे
  • D/O –डॉटर ऑफ जर तुम्ही मुलगी असाल तर
  • W/O-वाइफ ऑफ कुणाची पत्नी असला तर
 3. Relative Name-वडिलांचं /पतीच नाव
  • तुम्ही जर शेतकर्‍याचा सबंधा मध्ये S/O किंवा D/O निवडल असेल तर वडिलाचे नाव टाकावे
  • जर तुम्ही W/O निवडल असेल तर पतीचे नाव टाकवे.
 4. Mobile No. -मोबाइल नंबर
  • तुमचं मोबाइल नंबर टाकावा.
 5. नंतर वेरिफाय या बटन वर क्लिक करायचे आहे.क्लिक केल्यानंनातर तुमचा समोर एक पागे उघडेल तो या प्रकारे दिसेल.या मध्ये तुम्हाला एक WXnm लिहल आहे ते जशाच तस Enter Captcha Code चा बॉक्स मध्ये लिहायच आहे.आणि गेट ओटीपी (Get Otp) या बटन वर क्लिक करायचे आहे.
4 1

गेट ओटीपी (Get Otp) या बटन डब्ल्यूआर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं मोबाइल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल व एक नवीन पागे तुमचा समोर उघडेल तो या प्रकारे दिसेल.

5 1

एंटर ओटीपी (Enter Otp) मध्ये तुम्हाला तुमचं मोबाइल नंबर वर प्राप्त झालेला सहा अंकी ओटीपी बॉक्स मध्ये टाकायचा आहे.आणि सबमिट (Submit) या बटन वर क्लिक करायचे आहे.नंतर तुम्हाल मोबाइल नंबर हा वेरीफाय झाला म्हणून दिसून येईल.

6 1

5. Age (वय)

2023 मध्ये तुमचे वय किती आहे ते टाकावे.

6.Caste Category( जात )

येथे तुम्हाला तुमची जात निवडायची आहे.

7.Gender(जेंडर)

अर्जदार महिला आहे की पुरुष आहे हे सिलेक्ट करावे

8.Farmer Type(फार्मर टाइप)

 शेतकर्‍याचा प्रकार याचा मध्ये तुम्ही

 1. Small — 2.47105 चा वर  4.94211 चा खाली
 2. Marginal— 2.47105 ऐकर चा खाली.  
 3. Other-4.94211 एकर च वर

आहे ने निवडायचे आहे

9.फार्मर कॅटेगरी(Farmer Category)

 अर्जदार हा शेती च मालक आहे किंवा भाड्यावर/ठेक्याने/मकत्याने जमीन करतो काय या बद्दल माहिती द्यायची आहे,

 1. ओनर(Owner)- अर्ज करणारा व्यक्ति जमिनीचा मालक असेल तर
 2. टेनंट(Tenant)- अर्ज करणारा व्यक्तीने जेआर जमीन भाड्यानी/ठेक्यानी/मकत्यानी घेतली असेल तर 
 3. शेअर क्रोपर(Share Cropper)

फॉर्म चा दूसरा टप्पा

Residential Details

याचा मध्ये तुम्हाला तुम्ही कुठल्या राज्या मधून आहात,तुमचं जिल्हा काय आहे,तालुका/तहसील कुठला आहे,गाव कुठला आहे,आणि नंतर सपूर्ण पत्ता एका लाइन मध्ये लिहायचा आहे आणि तुमचं एरिया पिन कोड द्यायचा आहे.

7 1

1)State (राज्य)
तुम्ही ज्या राज्या मधले आहात त्या राज्याचे नाव.
2)District (जिल्हा )
तुम्ही ज्या जिल्हया मधले आहात त्या जिल्हया नाव.
3)Sub-District (तालुका / तहसील)
तुम्ही ज्या तालुक्या मधले आहात त्या तालुक्या नाव.
4)Residential Village/ Town (गाव )
तुम्ही ज्या गावा मधले आहात त्या गावाचे नाव.
5)Address (संपूर्ण पत्ता )
तुमचा संपूर्ण पत्ता.
6)Pin Code (पिन कोड)
तुम्ही ज्या भागात राहता तिथला पिन कोड.

फॉर्म चा तिसरा टप्पा

Farmer ID

इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर UID No मध्ये टाकायचा आहे आणि वेरीफाय या बटन वर क्लिक करायचे आहे.

8 1

वेरिफाय झाल्या नंतर तुम्हाला UID No सक्सेसफुली वेरीफाय झाला म्हणून दिसेल

9 1

फॉर्म चा चौथा टप्पा

Account Details

इथे तुम्हाला तुमचा बँक अकाऊंट ची माहिती द्यायची आहे ज्यात तुम्हाला बँक चा IFSC कोड आहे की नाही हे सांगायचे आहे,असल्यास IFSC कोड द्यायचा आहे.बँक कुठल्या राज्या मधली आहे.कुठल्या जिल्हया मधली आहे.बँक कुठली आहे,कुठली ब्रांच आहे,आणि शेवटी तुम्हाला बँक अकाऊंट नंबर टाकायचा आहे.

10 1
 1. IFSC (आय फ एस सी कोड)
  येथे तुम्हाला IFSC नंबर टाकायचा आहे जो तुम्हाला तुमचं बँक पासबूक मध्ये लिहला राहतो.
 2. State (राज्य)
  येथे तुम्हाला बँक जर महाराष्ट्र मधली असल्या मुले महाराष्ट्र सिलेक्ट करायचे आहे.
 3. District (जिल्हा)
  येथे तुम्हाला बँक कुठल्या जिल्हया मधली आहे.ते सिलेक्ट करायचे आहे.
 4. Bank Name (बँक च नाव)
  येथे तुम्हाला बँक चे नाव सिलेक्ट करायचे आहे.
 5. Bank Branch Name (बँक ब्रांच)
  येथे तुम्हाला बँक कुठल्या ब्रांच ची आहे. ते सिलेक्ट करायचे आहे.
 6. Savings Bank A/C No. (बँक अकाऊंट नंबर)
  येथे तुम्हाला बॅंकचे बँक अकाऊंट नंबर टाकायची आहे.
 7. Confirm Savings Bank A/C No (बँक अकाऊंट नंबर)
  येथे तुम्हाला पुन्हा एकदा बॅंकचे बँक अकाऊंट नंबर टाकायची आहे.कन्फर्म करायसाठी.
 8. Enter Captcha Code
  येथे तुम्हाला वर लिहून दिलेले अक्षर हे Enter Captcha Code अस लिहलेल्या बॉक्स मध्ये टाकायचे आहे.
 9. Create user(वापरकर्ता तयार करा)
  सर्व माहिती भरून झाल्यावर क्रिएट यूजर (Create User) या बटन वर क्लिक करा.

क्रिएट यूजर (Create User) या बटन वर क्लिक केल्यानंतर तुमचा समोर एक पागे उघडेल ज्या मध्ये तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती दिसेल व सर्वात खाली नेक्स्ट NEXT बटन दिसेल.तुम्हाला Next बटन वर क्लिक करायचे आहे.

11 1

Next बटन वर क्लिक केल्या नंतर तुमचं समोर एक नवीन पेज उघडेल जो तुमचा समोर या प्रकारे दिसेल.

 1. या पेज तुम्हाला तुमची बँक कुठल्या राज्य मधली आहे,जिल्हा,बँकेचे नाव,ब्रांच,अकाऊंट नंबर,आय फ स सी कोडे दिसेल.या मध्ये तुम्हाला तुमचं कुठल अकाऊंट सिलेक्ट करायच आहे ते सिलेक्ट करावे.
 2. आणि नेक्स्ट (Next) या बटन वर क्लिक करावे.
12 2

नंतर (Next) या बटन वर क्लिक केल्यानंतर तुमचं समोर एक नवीन पेज उघडेल जो या प्रकारे दिसेल.या मध्ये तुम्हाला पीक विमा योजना,पिकाची माहिती,क्षेत्राची माहिती भरायची आहे.

13 1
 1. State
  स्टेट मध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे
 2. Scheme (स्कीम)
  स्कीम वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला प्रधान मंत्री फसल विमा योजना सिलेक्ट करायची आहे.
 3. Season (सीजन)
  या मध्ये तुम्हाला तुमची लागवड कुठल्या हंगामाची आहे हे सांगायचे आहे.खरीप अथवा रबी हंगामाची.
 4. Year (इयर)
  इयर मध्ये तुम्हाला 2023 भरायचे आहे.

या नंतर तुम्हाला लँड डिटेल्स (Land Details) मध्ये जमिनी ची माहिती सिलेक्ट करायची आहे.
गोल असलेल्या भागवर क्लिक करायचे आहे.

14 1

वरची माहिती भरून झाल्यावर तुम्हाला पिकाची माहिती द्यायची आहे.

15 1
 1. Mix Cropping (मिक्स क्रोप्पिंग)
  तुम्ही जर दोन पीक घेत असाल टीआर मिक्स क्रोप्पिंग मध्ये यस(Yes) करायचे आहे.
  जर तुम्ही फक्त एक पीक घेत असाल तर नो (No) करायचे आहे.
 2. Crop(क्रॉप)
  या मध्ये तुम्हाला जे पीक घेता त्या बद्दल सांगायचे आहे.
 3. Sowing(सौइंग)
  या मध्ये तुम्हाला पेरणीची तारीख द्यायची आहे.
 4. Survey/Khata No.(सर्वे नंबर /खाता नंबर)
  या मध्ये तुम्हाला तुमचा सर्वे नंबर खाता नंबर द्यायचा आहे.
 5. Khasra/Plot No
  या मध्ये तुम्हाला तुमचा खसरा नंबर टाकायचा आहे.
 6. Verify
  आणि सर्व माहिती भारौन झाल्यावर तुम्हाला वेरीफी या बटन वर क्लिक कारचे आहे
  क्लिक केल्या नंतर तुमहाला तुमचा समोर एक पेज दिसेल तो या प्रकारे राहील
16

7.या मध्ये तुम्हाला तुमचा जमिनीची माहिती बरोबर असेल तर गोल काढलेला आहे त्याच वर क्लिक करायचे आहे
आणि सबमिट (Submit) या बटन वर क्लिक करायचे आहे.


क्लिक केल्या नंतर तुमहाला तुमचा समोर तुमचा समोर या प्रकारे माहिती दिसेल.या मध्ये तुम्हाला तुम्ही विमा काढलेल्या एरिया ची विमा रक्कम किती झालेली आहे.हे दाखवेल पण रक्कम किती ही दाखवत जारी असेल तुम्हाला फक्त 1 रुपया चं भरावा लागनर आहे.

17
 1. माहिती बघून झाल्यावर तुम्हाला नेक्स्ट (Next) या बटन वर क्लिक करायचे आहे.

3.अपलोड डॉक्युमेंट्स (Upload Documents)

या मध्ये तुम्हाला तुमची कागद पत्रे अपलोड करायची आहे.त्या साठी तुम्ही तुमचे कागदपत्र एका फोल्डर मध्ये अथवा एका जागेवर ठेवावे म्हणजे तुम्हाला अपलोड करायला त्रास जाणार नाही.

18


1) Adhaar card-तुमचं आधार कार्ड च फोटो
2)नमूना 8 अ
3)Passbook Photo
–तुमचा पासबूक चा पहिल्या पेज च फोटो टकायचा आहे आणि upload बटन वर क्लिक करायचे आहे.
4)Upload Your land Records-–डिजिटल स्वरूपाचा सातबारा पीडीएफ स्वरुपात अपलोड करायचा आहे. आणि upload बटन वर क्लिक करायचे आहे.
5)Sowing Certificate–आणि पीक पेरा स्वयंघोषणापत्र पीडीएफ स्वरुपात अपलोड करायचा आहे. आणि upload बटन वर क्लिक करायचे आहे.
पीक पेरा प्रमाण पत्र तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करून घ्यावा

खरीप पीक पेरा स्वयंघोषणापत्र Pik Pera pdf Download (Sowing Certificate pdf)--PDF DOWNLOAD

19

सर्व कागदपत्र अपलोड केल्या नंतर तुम्हाला तुम्हाला हा पेज खालील प्रमाणे दिसेल.जिथे तुम्हाला सक्सेस असा दिसेल याचा अर्थ तुमचे कागद हे योग्य रित्या अपलोड झाले आहेत.

सर्व डॉक्युमेंट्स योग्य रित्या अपलोड झाल्यावर नेक्स्ट(Next) या बटन वर क्लिक करायचे आहे.

नेक्स्ट बटन वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती ही एकदा दाखवली जाईल ती बरोबर आहे की नाही ही एकदा तपासून पहावी.ती माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिसेल.

20

माहिती तपासून झाल्यावर सबमिट(Submit) या बटन वर क्लिक करायचे आहे.

सबमिट(Submit) या बटन वर क्लिक केल्यानंतर तुमचं समोर पेमेंट करायसाठी एक पागे उघडेल जो या प्रकारे दिसेल.
या मध्ये तुम्ही तुमचं विम्याची एक रुपया रक्कम ही
1)क्रेडिट कार्ड
2)डेबिट कार्ड
3)कयू आर कोड
4)इंटरनेट बँकिंग
5यू पी आय (भीम यू पी आय वैगेरे सारख्या अॅप्लिकेशन च मदतीने)

21

जर तुमचं यू पी आय असेल तर त्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे.सिलेक्ट केल्या नंतर तुम्हाला तुमचं समोर अशी स्क्रीन दिसेल

22
 1. या मध्ये तुम्हाला मेक पेमेंट फॉर आरएस 1.00(Make Payment for Rs.1.00 या लिंक वर क्लिक करायचे आहे
 2. मेक पेमेंट फॉर आरएस 1.00(Make Payment for Rs.1.00 या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं समोर असा पेज दिसेल
23

1)या मध्ये तुम्हाला प्रोसिड विथ पेमेंट (Proceed With Payment) या बटन वर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा समोर एक असा पेज दिसेल
1)या मध्ये तुम्ही तुमचं यू पी आय आय डी टाकून payment करू शकता अथवा क्यु आर कोड दिला आहे त्याला स्कॅन करून पण पेमेंट करू शकता

24 1

पेमेंट झाल्यानंतर शेतकरी अर्जाची पावती तुम्हाला तुमचं स्क्रीन वर दिसेल.

तुम्हाला प्रिंट काढायची असल्यास प्रिंट पॉलिसी रीसीप्ट वर क्लिक करून प्रिंट काढून घ्यावी.

25

अश्या प्रकारे तुम्ही पीक विमा योजने साठी अर्ज करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- पीक विमा योजना कुणी सुरू केली?
उत्तर:- प्रधानमंत्री फसल विमा योजना (प्रधानमंत्री पीक विमा योजना) 13 फेब्रुवारी 2016 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.

प्रश्न:- Pmfby चे CEO कोण आहेत?
उत्तर:- रितेश चौहान
अलीकडेच (२१ ऑक्टोबर रोजी) प्रधाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली… नोकरशाहीच्या फेरबदलाचा एक भाग म्हणून, आशिष कुमार भुतानी यांच्या जागी रितेश चौहान यांची प्रधान मंत्री फसल विमा योजना (PMFBY) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

प्रश्न:- भारतात पीक विम्याचे नियमन कोण करते?
उत्तर:- भारताची कृषी विमा कंपनी AIC ला भारत सरकारने NAIS ची देशव्यापी पीक विमा कार्यक्रमाची “अंमलबजावणी करणारी संस्था” म्हणून नियुक्त केले आहे.

प्रश्न:- पीक विमा योजनेचे फायदे?
उत्तर:- ही योजना राज्यातील शेतकर्‍यांसाठी सुरक्षिततेचे जाळे म्हणून काम करते, पिकाच्या नुकसानीच्या परिस्थितीतही त्यांच्याकडे पुरेसा निधी असल्याचे सुनिश्चित करते. याव्यतिरिक्त, या योजनेचे उद्दिष्ट शेतकर्‍यांना शेतीतील नवीन आणि प्रगत तंत्रांबद्दल शिक्षित करणे आहे.

प्रश्न:- मी माझी पिक विमा यादी कशी तपासू?
उत्तर:- PMFBY यादी महाराष्ट्र 2023 या यादीसाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
1)त्यानंतर तुम्हाला ‘Statistics’ वर क्लिक करावे लागेल.
2)क्लिक केल्यानंतर, पीएम पीआयके विमा योजना लाभार्थी स्थिती निवडा.
3)पुढील पृष्ठावर, तुम्हाला विचारलेले तपशील भरावे लागतील.त्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.

प्रश्न:- पीक विमा म्हणजे काय?
उत्तर:- पीक विमा हे पीक अपयश/निष्‍ठित किंवा त्यांच्या नियंत्रणाबाहेरील सर्व अनपेक्षित संकटांमुळे उद्भवणार्‍या अनिश्चिततेमुळे शेतक-यांना आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे एक साधन आहे.

प्रश्न:- किती विमा कंपन्यांनी PMFBY योजना लागू केली आहे?
उत्तर:- 18 सामान्य विमा कंपन्या
2020-21 या कालावधीत प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) च्या अंमलबजावणीसाठी 18 सामान्य विमा कंपन्यांचे पॅनेल करण्यात आले आहे. 2020-21 या वर्षात एका नवीन कंपनीचाही समावेश करण्यात आला आहे.

प्रश्न:- पीक विमा काढण्या साथी लागणारे कागदपत्र?
उत्तर:-
1)आधार कार्ड
2)सातबारा
3)बँक पासबूक
4)पीक पेरा प्रमाणपत्र

प्रश्न:- खरीप हंगामा मध्ये येणारी पिके?
उत्तर:-
1)भात (धान),
2)ज्वारी
3)बाजरी
4)नाचणी
5)मूग
6)उडीद
7)तूर
8)मका
9)भूईमूग
10)कारळे
11)तीळ
12)सूर्यफूल
13)सोयाबीन
14)कापूस
15)खरिप कांदा
या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.

प्रश्न:- रबी हंगामा मध्ये येणारी पिके?
उत्तर:-
1)गहू
2)रबी ज्वारी
3)हरभरा
4)उन्हाळी भात
5)उन्हाळी भूईमूग
6)रबी कांदा

प्रश्न:- प्रश्न पीक विमा योजनेची उद्दिष्टे?
उत्तर:-
•नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे कोणतेही अधिसूचित पीक अपयशी झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
•शेतीमध्ये शाश्वत प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे.
•शेतकऱ्यांना शेतीमध्ये नावीन्यपूर्ण आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे.
•कृषी क्षेत्राला पतपुरवठा सुनिश्चित करणे.

प्रश्न:- कोणत्या कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण लागू होणार नाही?
उत्तर:-
•युद्ध आणि आत्मा धोका
•आण्विक धोका
•दंगा
•दुर्भावनापूर्ण नुकसान
•चोरी किंवा शत्रुत्वाची कृती
•पाळीव आणि/किंवा वन्य प्राण्यांचे चरणे आणि इतर टाळता येण्याजोगे धोके कव्हरेजमधून वगळले जातील.

प्रश्न:-पीक विमा योजेणे साठी कुठल्या बँकच अकाऊंट पाहिजे?
उत्तर:-भारता मधील रिजर्व बँक च हद्दीत येणार्‍या सर्व बँक

प्रश्न:-पीक विमा योजना हेल्प लाइन नंबर?
उत्तर:- ते आमच्या फार्ममित्रा मोबाईल ऐपचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचू शकतात किंवा आम्हाला १८००-२०९-५९५९ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. माहितीमध्ये बँक खाते क्रमांक (कर्जदार शेतकरी) आणि बचत बँक खाते क्रमांक (नॉन-कर्जदार शेतकरी) यासह सर्वेक्षण क्रमांकानुसार विमा उतरवलेले पीक आणि प्रभावित एकर क्षेत्राचा तपशील असणे आवश्यक आहे.

प्रश्न:- पीक विमा योजना नाही काढले तर होणारे नुकसान?
उत्तर:-जे शेतकरी पीक विमा काढणार नाही.यांचे पिकाचे भविष्यात काही नुकसान झाल्यास भरपाई मिडणार नाही

प्रश्न:- पीक विमा काढायसाठी लागणारी रक्कम?

उत्तर :-फक्त 1 रुपये

अश्याच प्रकारचा माहिती साठी आमचाशी जुडून रहा —-Free Bharat Info


Share This Info

Leave a Reply